महासंधी in
Job Filter:
Current Openings Hub
महासंधी in

© 2026 MahaSandhi.in - All Rights Reserved

Important Update (महत्वाचे अपडेट)
Live
🔥 SSC JE भरती २०२६: १,७४८ कनिष्ठ अभियंता (JE) जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू September 02, 2026
🚨 MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ पुढे ढकलली: (अधिकृत शुद्धीपत्रक)September 09, 2026
🔥 CTET २०२६: २२ व्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू (०१ सप्टेंबर मुदतवाढ)August 25, 2026
Admission • July 05, 2026

MHT CET B.E. / B.Tech Counselling 2026: अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया

Complete guide to MHT CET 2026 engineering counselling. Learn about E-Scrutiny vs Physical Scrutiny, required documents, Caste Validity, and important dates.

महाराष्ट्र राज्यातील अभियांत्रिकी (Engineering) आणि तंत्रज्ञान पदवी प्रवेशासाठीची MHT CET Counselling (CAP Rounds) २०२६ ची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे कागदपत्रे पडताळणी (Document Verification) होय. जर कागदपत्रांमध्ये त्रुटी राहिली किंवा मुदतीपूर्वी पडताळणी झाली नाही, तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा तुमची श्रेणी (Category) बदलून तुम्हाला प्रवेशासाठी खुल्या (Open) प्रवर्गात गृहीत धरले जाऊ शकते. त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचा.

१. पडताळणी पद्धत: Physical vs E-Scrutiny (कोणती निवडावी?)

सीईटी सेलने विद्यार्थ्यांसाठी दोन प्रकारचे पडताळणी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत:

🏢 भौतिक पडताळणी (Physical Scrutiny) - शिफारस

• विद्यार्थ्यांना जवळच्या अधिकृत सुविधा केंद्रावर (FC Center) प्रत्यक्ष जावे लागते.
• तुमच्या समोरच मूळ कागदपत्रे तपासली जातात आणि त्वरित अर्ज कन्फर्म केला जातो.
• जर अर्जात काही चूक असेल, तर तिथेच लगेच दुरुस्त करता येते.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या पद्धतीलाच प्राधान्य द्यावे.

💻 ई-पडताळणी (E-Scrutiny)

• कागदपत्रे ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करावी लागतात.
• सीईटी सेलचे अधिकारी ऑनलाईन पडताळणी करतात.
• कागदपत्रांमध्ये चूक असल्यास अर्ज पुन्हा त्रुटीसह (Query) विद्यार्थ्याकडे पाठवला जातो.
• ही प्रक्रिया वेळ घेणारी असू शकते. महाराष्ट्र बाहेरील (OMS) विद्यार्थ्यांसाठी ही सोयीची आहे.

२. अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

पडताळणी पूर्ण करण्यासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:

🗂️ MHT CET २०२६ / JEE Main गुणपत्रक सीईटी किंवा जेईई परीक्षांचे स्कोअरकार्ड.
🗂️ दहावी व बारावीची गुणपत्रके SSC आणि HSC मार्कशीट मूळ स्वरूपात.
🗂️ रहिवासी प्रमाणपत्र (Domicile) महाराष्ट्र राज्याचा कोटा मिळवण्यासाठी आवश्यक.
🗂️ शाळा सोडल्याचा दाखला (LC/TC) उमेदवाराचे राष्ट्रीयत्व आणि जन्मतारीख पडताळणीसाठी.
🗂️ जात प्रमाणपत्र (Caste Certificate) राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी (लागू असल्यास).
🗂️ जात वैधता प्रमाणपत्र (Validity) अभियांत्रिकी प्रवेशासाठी वैध जात वैधता आवश्यक.
🗂️ नॉन-क्रिमी लेयर (NCL) OBC, VJ/NT, SBC प्रवर्गासाठी (चालू आर्थिक वर्षाचे वैध).
🗂️ उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate) उत्पन्न ८ लाखांच्या आत असल्यास (TFWS/EWS साठी आवश्यक).
🗂️ जेईई स्कोर कार्ड (DigiLocker) जेईई धारकांसाठी डिजीलॉकरद्वारे फेच केलेले स्कोरकार्ड.

३. TFWS आणि OMS प्रवर्ग नियम

Tuition Fee Waiver Scheme (TFWS): ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा कमी आहे, ते या सवलतीसाठी पात्र आहेत. फॉर्ममध्ये यासाठी 'Yes' निवडावे. या जागेसाठी महाविद्यालयांचे स्वतंत्र कट-ऑफ लागतात आणि ते सहसा खूप जास्त असतात.

Outside Maharashtra State (OMS): जे विद्यार्थी मूळचे महाराष्ट्रातील नाहीत किंवा ज्यांचे पालक बाहेरील राज्यातील असून डिफेन्समध्ये आहेत, ते OMS प्रवर्गात मोडतात. त्यांना सामान्यतः कोणतेही आरक्षण किंवा सरकारी सवलती मिळत नाहीत. त्यांना खुल्या (Open/General) प्रवर्गातूनच प्रवेश मिळतो.

४. महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक २०२६

तपशील (Event) शेवटची तारीख (Deadlines)
ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज सादर करणे १२ जुलै २०२६ पर्यंत
कागदपत्रे पडताळणी व निश्चिती (E-Scrutiny / Physical) १३ जुलै २०२६ (दुपारी ५:०० वाजेपर्यंत)
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर (Provisional Merit List) १५ जुलै २०२६
हरकती नोंदवणे (Grievance Period) १५ जुलै ते १८ जुलै २०२६ (१९ ते २२ जुलै पर्यंत मुदतवाढ)
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध (Final Merit List) २० जुलै २०२६
मुदतवाढ (Extension) • Updated: July 16, 2026

Grievance Period (हरकती नोंदवणे) कालावधीत वाढ!

कॅप प्रवेश प्रक्रियेसाठी हरकती नोंदवण्याचा (Grievance Period) कालावधी अधिकृतपणे वाढवून आता १९ ते २२ जुलै २०२६ करण्यात आला आहे. उमेदवार त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन दुरुस्तीसाठी अर्ज करू शकतात.

📢 महत्त्वाची टीप: तुमचा अर्ज यशस्वीरीत्या पडताळणी झाल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये "Your application form is verified and confirmed by the FC Center" असा स्टेटस दिसणे आवश्यक आहे. हा स्टेटस आल्यावरच तुमचा अर्ज कॅप राउंडसाठी पात्र ठरतो.

५. नावात चूक, पावती आणि इतर शंकांचे निरसन (FAQ)

प्रश्न: माझ्या मार्कशीट आणि आधार कार्डमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक आहे, अर्ज रिजेक्ट होईल का?

उत्तर: यामुळे तुमचा अर्ज थेट रिजेक्ट होत नाही. नावामध्ये किरकोळ स्पेलिंगच्या चुका असतील तर तुम्ही ₹५०० च्या नोटरी स्टॅम्प पेपरवर एक प्रतिज्ञापत्र (Affidavit) तयार करून घ्या आणि फिजिकल स्क्रूटनी दरम्यान ते सादर करा.

प्रश्न: माझ्याकडे मूळ जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) नाहीये, मी काय करू?

उत्तर: जर मूळ वैधता प्रमाणपत्र आले नसेल, तर तुम्ही अर्ज करताना मिळालेली **पावती (Receipt)** अपलोड करू शकता. परंतु, कॅप राउंडच्या प्रवेशावेळी तुम्हाला मूळ प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

प्रश्न: जात वैधता प्रमाणपत्र पावती अपलोड करताना API किंवा तांत्रिक त्रुटी येत आहे.

उत्तर: अशा वेळी तात्पुरते लॉग आऊट करा, इंटरनेट ब्राउझर बदलून पहा (उदा. Google Chrome चा वापर करा) किंवा इनकॉग्निटो विंडोमध्ये प्रयत्न करा. तरीही अडचण आल्यास फिजिकल स्क्रूटनी सेंटरला भेट द्या.

प्रश्न: कागदपत्रांमध्ये जात वैधता क्रमांक कोणता टाकावा?

उत्तर: जात वैधता प्रमाणपत्राचा नंबर टाकताना बारकोडच्या खालचा क्रमांक टाकू नये. प्रमाणपत्रावर स्पष्टपणे दिलेला जावक क्रमांक (Outward Number) हाच नंबर फॉर्ममध्ये प्रविष्ट करावा.

प्रश्न: ई-पडताळणीत माझ्या अर्जाची वर्गवारी ओबीसीवरून खुल्या (Open) प्रवर्गात बदलली आहे, यावर काय उपाय?

उत्तर: कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे अधिकारी प्रवर्ग बदलतात. तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन काय अडचण आली आहे ते तपासा. योग्य कागदपत्रे पुन्हा अपलोड करा किंवा जवळच्या फिजिकल स्क्रूटनी केंद्रावर जाऊन दुरुस्ती करून घ्या.

प्रश्न: माझा जुना मोबाईल नंबर बंद झाला असून ओटीपी मिळत नाही, नवीन नोंदणी कशी करू?

उत्तर: यासाठी तुम्ही स्वतः बदल करू शकत नाही. तुम्हाला तातडीने सीईटी सेलला (CET Cell) ई-मेल पाठवून किंवा अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधून मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावा लागेल.

English

MHT CET Counselling 2026: Online Registration, Document Verification Modes & Rules

The Centralized Admission Process (CAP) for engineering degree programs in Maharashtra has commenced. The primary hurdle in securing admission is the document verification stage. Learn how to successfully confirm your candidature, select between E-Scrutiny and Physical Scrutiny, and avoid general form-filling mistakes.

The state common entrance test cell of Maharashtra has launched the registration portal for MHT CET Counselling (CAP Rounds) 2026. For candidates looking to seek admission into undergraduate engineering (B.E/B.Tech) courses, registering correctly and completing document verification is mandatory. Any discrepancies in documents will result in candidate reassignment to the Open Category. Below is the detailed breakdown of guidelines.

1. Verification Modes: Physical Scrutiny vs. E-Scrutiny

Candidates must choose between the following two modes during the application form filling:

🏢 Physical Scrutiny (Highly Recommended)

• Book a time slot and visit the nearest facilitation center (FC) in person.
• Verification officers evaluate physical original documents and confirm the application instantly.
• Any registration errors can be edited on-the-spot by the officer.
Best option for students residing in Maharashtra.

💻 E-Scrutiny (Online Mode)

• Upload scanned copies of all required certificates online.
• Officers review documents remotely from the portal.
• If documents are unreadable or incorrect, a query is sent back to the student's dashboard.
• Highly time-consuming. Recommended only for candidates residing outside Maharashtra (OMS).

2. Essential Documents for MHT CET Counselling

Ensure you have original files and photocopies of these documents ready:

🗂️ MHT CET / JEE scorecard Original exam scorecards (fetch JEE via DigiLocker).
🗂️ SSC & HSC Marksheets Class 10th and 12th pass certificates.
🗂️ Domicile / Birth Certificate Proof of birth or residency in Maharashtra.
🗂️ School Leaving Certificate LC or Transfer Certificate stating nationality.
🗂️ Caste Certificate Mandatory for reserved categories (SC/ST/OBC).
🗂️ Caste Validity Certificate Mandatory document. Validity receipt is accepted initially.
🗂️ Non-Creamy Layer (NCL) For OBC, SBC, VJNT (must be valid for current financial year).
🗂️ Income Certificate Issued by competent authority (less than 8 Lakhs for TFWS).
🗂️ Photo & Signature Correct specifications for online profile.

3. Special Categories: TFWS & OMS Candidates

Tuition Fee Waiver Scheme (TFWS): Offers 100% tuition fee waiver for candidates with annual family income below ₹8 Lakhs. You must click "Yes" during registration. Note that TFWS seat cutoffs are generally much higher than regular seats.

Outside Maharashtra State (OMS): Applicable to students whose domicile state is not Maharashtra or whose parents are defense personnel stationed outside. OMS candidates participate based on their JEE Main/MHT CET scores under the Open/General category without local state quota reservations.

4. Important Counselling Schedule 2026

Event Deadline
Online Registration & Form Submission Until 12th July 2026
Document Verification & Application Confirmation 13th July 2026 (until 5:00 PM)
Release of Provisional Merit List 15th July 2026
Grievance Submission Period 15th to 18th July 2026 (Extended: 19th - 22nd July)
Release of Final Merit List 20th July 2026
Extension Notice • Updated: July 16, 2026

Grievance Submission Period Extended!

The Grievance Submission Period for CAP counselling has been officially extended. The new extended dates are from 19th July to 22nd July 2026. Log in to submit any correction requests.

📢 Important Status: After successful scrutiny, ensure your dashboard displays "Your application form is verified and confirmed by the FC Center". Only confirmed forms are eligible for CAP option entry rounds.

5. Common Counselling Problems & Solutions (FAQ)

Q: My name spelling differs between Aadhaar Card and 10th marksheet. Will my form be rejected?

Answer: Minor spelling differences will not lead to direct rejection. You must create a notarized affidavit on a **₹500 stamp paper** explaining the name variance, and show it during Physical Scrutiny.

Q: I don't have my original Caste Validity certificate yet. What should I upload?

Answer: You can upload the **acknowledgement receipt** of your application for Caste Validity. However, you must present the original Caste Validity certificate at the college during final admission.

Q: API error occurs when uploading the Caste Validity receipt. How to fix?

Answer: Log out of the portal, clear your web browser cookies/cache, or complete the upload using Google Chrome in Incognito mode. If the issue persists, visit a Physical Scrutiny center.

Q: Which certificate number should I enter for Caste Validity?

Answer: Do not enter the barcode number. Input the official **Outward Number (जावक क्रमांक)** printed on the top/bottom of your Caste Validity certificate.

Q: My mobile number is closed, and I'm not getting the OTP. What should I do?

Answer: You cannot change it yourself. You must contact the CET Cell support via official helpline or send an email requesting a mobile number modification.

Q: During E-Scrutiny, my category got changed to Open. How do I fix this?

Answer: Category is converted to Open when submitted certificates are invalid or incomplete. Check the query logs in your dashboard, correct the documents, re-upload them, or visit the nearest FC to restore your category status.

Source: Official Notification released by concerned department.